सांगलीच्या जागेसाठी उबाठाची काँग्रेसकडे १०० कोटींची मागणी?
मुंबई : खरा पंचनामा
सांगलीची जागा सोडण्यासाठी उबाठा गटाने काँग्रेसकडे १०० कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती मला मिळाली आहे, असा दावा भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. तसेच संजय राऊत यासाठीच सांगली दौऱ्यावर गेले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला.
नितेश राणे म्हणाले की, "संजय राजाराम राऊत आज सांगली दौऱ्यावर आहे. उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेला उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी आणि गाठीभेटी घेण्यासाठी हे महाशय सांगलीच्या दौऱ्यावर असल्याचे चित्र दाखवले जाते. पण मला सकाळी पुण्यातील एका काँग्रेस नेत्याचा फोन आला होता. सांगली लोकसभेची चंद्रहार पाटील यांची उमेदवारी आम्ही मागे घेतो. आम्हाला १०० कोटी द्या असा प्रस्ताव मातोश्रीवरून ठेवण्यात आलेला असल्याचे त्यांनी मला सांगितले आहे. या प्रस्तावर दबाव टाकण्यासाठी आणि काँग्रेसला झुकवण्यासाठी संजय राऊतांचा सांगलीमध्ये दौरा सुरु आहे."
"तिकडच्या उबाठाच्या कार्यकर्त्यांना आणि चंद्रहार पाटलांना वाटत असावं की, संजय राऊत आमच्यासाठी आले आहेत. पण खरंतर उद्धव ठाकरे जो व्यवहार करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यासाठी ते गेले आहेत. सांगलीची जागा मागे घेण्यासाठी किमान मला १०० कोटी द्या, असा प्रस्ताव उबाठाने ठेवला आहे. ही माहिती खरी आहे की, खोटी याचं उत्तर राऊतांनी किंवा त्यांच्या मालकाने द्यावं," असे ते म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.