Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगली एलसीबीचे प्रभारी पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

सांगली एलसीबीचे प्रभारी पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर



मुंबई ः खरा पंचनामा

महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना उत्तम कामगिरीसह उल्लेखनीय आणि प्रशंसनीय सेवेबद्दल पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र जाहीर करण्यात आले आहे. राज्य पोलिस दलात १९ वर्षे सेवा बजावणारे सध्याचे सांगली एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनाही हे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या सहीने सन्मानचिन्ह प्राप्त अधिकारी, अंमलदारांची नावे शुक्रवारी जाहीर करण्यात आली आहेत.

निरीक्षक शिंदे हे मूळचे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील रेठरेधरण येथील आहेत. दि. १ जुलै २००५ मध्ये ते पोलिस दलात उपनिरीक्षक पदावर दाखल झाले. त्यानंतर त्यांनी २००६ ते २०१० या काळात पुणे शहरातील कोथरूड आणि सहकारनगर पोलिस ठाण्यात सेवा बजावली. २०१० ते २०१२ या काळात गडचिरोली येथे सी ६० आणि एलसीबीत सेवा बजावली. २०१२ ते २०१३ या काळात ते गोंदिया येथे वाहतूक विभागात कायर्रत होते. २०१३ ते २०१४ या काळात पुणे ग्रामीण एलसीबी येथे तर २०१४ ते २०१६ या काळात वडगाव मिठाळकर पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणून त्यांनी काम पाहीले आहे. २०१६ ते २०१८ या काळात त्यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकांचे वाचक म्हणूनह काम केले होते.

२०१८ ते २०१९ या काळात ते इचलकरंजी एलसीबीचे प्रभारी अधिकारी होते. २०१९ ते २०२१ या काळात त्यांची निरीक्षकपदी पदोन्नती झाली. त्यावेळी त्यांनी तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्रात सेवा बजावली आहे. २०२१ ते २०२२ या काळात त्यांनी सांगली शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणून तर २०२२ ते आजअखेर सांगली एलसीबीचे प्रभारी अधिकारी म्हणून काम पहात आहेत.  

२०१२ ते २०१३ या काळात गडचिरोली येथील सेवेबद्दल खडतर सेवा पदक व विशेष सेवा पदकाने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. त्यांनी आजपर्यंतच्या सेवा काळात अनेक किचकट प्रकरणांचा, गुन्ह्यांचा छडा लावला आहे. सांगली एलसीबीचे प्रभारी म्हणून कार्यभार घेतल्यानंतर आतापयर्ंत तब्बल २५० हून अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले आहे. विशेषतः खून आणि दरोड्याचे गुन्हे उघडकीस आणण्यात त्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. त्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.