Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

UPSC चे निकाल जाहीर; आदित्य श्रीवास्तव देशात पहिला, तर अनिमेश प्रधान दुसऱ्या क्रमांकावर!

UPSC चे निकाल जाहीर; आदित्य श्रीवास्तव देशात पहिला, तर अनिमेश प्रधान दुसऱ्या क्रमांकावर!नवी दिल्ली : खरा पंचनामा

केंद्रीय लोकसेवा आयोगाचे निकाल जाहीर झाले असून आदित्य श्रीवास्तव देशात पहिला तर अनिमेश प्रधान देशात दुसरा आला आहे. गेल्या दोन परीक्षांमध्ये यूपीएससीचे पहिले तीन क्रमांक मुलींनीच पटकावल्याचं दिसून आलं होतं.

यंदा मात्र मुलांनी बाजी मारली आहे. देशात तिसऱ्या क्रमांकावर डोनुरू अनन्या रेड्डी आहे. २०२३मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षांचे हे निकाल असून upsconline.nic.in आणि upsc.gov.in या संकेतस्थळांवर सविस्तर निकाल पाहाता येईल.

यंदा यूपीएससीच्या परीक्षांमध्ये १०१६ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ३४७ उमेदवार खुल्या प्रवर्गाचे, ११६ उमेदवार आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे, ३०३ उमेदवार ओबीसी प्रवर्गाचे, १६५ उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गाचे तर ८६ उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आहेत. गेल्या वर्षी हेच प्रमाण खुला प्रवर्ग - ३४५, आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग - २८, ओबीसी - ५२, अनुसूचित जाती – ५ तर अनुसूचित जमाती – ४ असं होतं.

आयएएस अर्थात भारतीय प्रशासकीय सेवा, आयपीएस अर्थात भारतीय पोलीस सेवा, आयएफएस अर्थात भारतीय परराष्ट्र सेवा व गट अ आणि गट ब मधील इतर केंद्रीय सेवांसाठी ही पदभरती करण्यात येणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.