Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तब्बल 15 लाख 30 हजाराच्या 17 दुचाकी जप्त कराड शहर डी.बी पथकाची कामगिरी, कागलचा चोरटा अटकेत

तब्बल 15 लाख 30 हजाराच्या 17 दुचाकी जप्त
कराड शहर डी.बी पथकाची कामगिरी, कागलचा चोरटा अटकेत



संभाजी पुरीगोसावी 
सातारा : खरा पंचनामा

कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सध्या दुचाकी  चोरांचे प्रमाण चांगले वाढले असून. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी कराड शहर तसेच उपनगरात होणाऱ्या मोटरसायकली चोरी बाबत विशेष आढावा घेवुन कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तत्काळछडा लावण्याबाबत आदेशीत केले होते. 

त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी रचना तयार करून आणि वरील सदर कारवाई मध्ये मोठे यश कराड शहर पोलीस ठाण्यातील डी. बी. पथकाने मिळवले आहे. एका सराईत मोटरसायकल चोरांस मोठ्या शिताफीने अटक करून जवळपास 15 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या 17 मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. 

मागील काही वर्षात चोरीच्या मोटरसायकली जप्त  करण्याची ही सर्वात मोठी कामगिरी मानली जात आहे. कराड शहरांतील आगशिवनगरांत पोलीस पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एक संशयित आरोपी दिसून आला. या संशयितांच्या हालचालीवरून त्याच्या ताब्यांत असलेल्या दुचाकीबाबत पोलीसांनी चौकशी केली असता. दुचाकी चोरीची असल्याचे समोर आले. डी.बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांनी आरोपीला विश्वासांत घेवुन त्याने दुचाकी चोरीच्या कबुल्या दिल्या. अखेर डी.बी. पथकांने आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.  प्रकाश बाबासो निंबाळकर (वय 45, रा. सांगाव ता. कागल जि. कोल्हापूर) असे आरोपींचे नाव आहे. आरोपी प्रकाश निंबाळकर यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. 

सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, सो.स.फौ. रघुवीर देसाई, नागनाथ भरते, शशिकांत काळे, अमित पवार, बाळासाहेब जगदाळे, अशोक वाडकर, पो. ना. कुलदीप कोळी, संतोष पाडळे, अनिल स्वामी, पो.शि. महेश शिंदे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, संग्राम पाटील आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.