Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'मुश्रीफांनी डॉ. तावरेची नियुक्ती केली, त्यांच्याच आदेशाने काम झालं' 2 डॉक्टरांच्या अटकेनंतर आमदाराचा गंभीर आरोप

'मुश्रीफांनी डॉ. तावरेची नियुक्ती केली, त्यांच्याच आदेशाने काम झालं'
2 डॉक्टरांच्या अटकेनंतर आमदाराचा गंभीर आरोप



पुणे : खरा पंचनामा

कल्याणीनगरमधील अपघाताप्रकरणी ब्लड रिपोर्ट बदलल्याच्या आरोपाखाली ससूस हॉस्पिटलमधील दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी काँग्रेसचे नेते आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी वैद्यकीय शित्रणमंत्री हसन मुश्रीम यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या आशीर्वादाने ससूनमधील २ डॉक्टर काम करत होते, असा आरोप त्यांनी केला आहे.

ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हरलोर यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. यावर बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले की, ससून रुग्णालयाचा ढिसाळ कारभार सुरु आहे. मी गेल्या एक वर्षापासून यावर बोलत आहे. सरकार अशा लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. या खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी अजून डोळे उघडले नाहीत.

डॉ. अजय तावरे या व्यक्तीला त्या पदावर बसवण्याचे काम हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. मुश्रीफ असं वागत असतील तर यांच्याकडून काय अपेक्षा करायची. हा प्रचंड मोठा घोटाळा आहे. अजय तावरे हा गेल्या अनेक वर्षांपासून रिपोर्ट बदलणे असले काम करत आला आहे. त्याचा हा गोरख धंदा आहे. ससूनसारख्या हॉस्पिटलमध्ये मुश्रीफ यांची लाडावलेली पिळावळ आहे.

अजय तावरे याला या प्रकरणात कोणाचा फोन आला होता. हसन मुश्रीफ यांनी राजीनामा द्यावाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणखी अनेक मासे गळाला लागणार आहे।. अशा लोकांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे.

हसन मुश्रीफ यांनी धंगेकरांची आरोप फेटाळून लावले आहेत. धंगेकर बिनबुडाचे आरोप करत आहेत. धंगेकर यांनी २ दिवसात माफी मागितली नाही, तर यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असं मुश्रीफ म्हणाले आहेत. दरम्यान, डॉ. तावरे याच्या नियुक्तीसाठी आमदार सुनील टिंगरे यांनी शिफारसपत्र दिलं होतं. त्यानंतर मुश्रीफ यांनी त्यांची नियुक्ती केली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.