Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'कारमध्ये 4 जण होते, ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला'

'कारमध्ये 4 जण होते, ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला'पुणे : खरा पंचनामा

कल्याणी नगरमधील अपघाताप्रकरणी पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली आहे. सदर प्रकरणामध्ये पोलीस सुरुवातीपासूनच बारकाईने काम करत आहेत. आम्ही कायदेशीर मार्गाने जात आहोत. त्यामुळे दबाव किंवा दिरंगाई झाली असं म्हणणं योग्य नाही, असं अमितेश कुमार म्हणाले.

आरोपीचे अद्याप ब्लड रिपोर्ट मिळालेले नाहीत. आरोपीला काही विशेष सुविधा देण्यात आली किंवा काही खाद्यपदार्थ देण्यात आले याबाबत पुरावे मिळालेले नाहीत. तरी आम्ही याप्रकरणी तपास करत आहोत. कलम ३०४ लावण्यास उशीर का झाला याची चौकशी सुरु आहे. पण, कोणाचा आमच्यावर दबाब आहे असं म्हणणं योग्य नाही, असं आयुक्तांनी स्पष्ट केलं.

जे आरोप होत आहेत, त्याप्रकारचे काही आमच्या चौकशीमध्ये आढळलेलं नाही. दारुमुळे आरोपीला काही कळतच नव्हतं अशी परिस्थिती नव्हती. आरोपी पूर्ण शुद्धीत होता हा आमचा युक्तीवाद आहे. सकाळी नऊ वाजता आरोपीचे पहिली ब्लड सॅम्पल घेण्यात आले होते. आम्ही सर्व सीसीटीव्ही मिळवले आहेत. तपास सुरु आहे. सर्व गोष्टी सांगणं उचित नाही, असं ते म्हणाले.

काही काळाने ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला हे सत्य आहे. ड्रायव्हरने सुरुवातीला म्हटलं होतं की त्यानेच गाडी चालवली होती. त्याने कोणाच्या दबाबामुळे हे म्हटलं याचा देखील तपास सुरु आहे. घटनेचा सर्व क्रम आम्हाला कळाला आहे. आमदार सुनिल टिंगरे हे पोलीस स्टेशनमध्ये आले होते हे सत्य आहे, असं आयुक्तांनी स्पष्ट केलं.

आमची केस ब्लड रिपोर्टवर अवलंबून नाही. सुरुवातीला थोडी दिरंगाई झाली हे सत्य आहे. घटनाक्रम कळताच कलम ३०४ लावण्यात आले आहे. त्या रात्रीचे सर्व सीसीटीव्ही आमच्याकडे आहेत. गुन्हे शाखेकडून युद्ध पातळीवर तपास सुरु आहे. पार्टीमध्ये १० ते १२ जण होते. अपघातावेळी कारमध्ये चारजण होते. काही निष्काळजीपणा आणि दोष येरवाड्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यांच्यावर कारवाई होईल, असंही ते म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.