Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबईतील सहा मतदार संघात महाविकास आघाडीचे मराठी चेहरे

मुंबईतील सहा मतदार संघात महाविकास आघाडीचे मराठी चेहरे



मुंबई : खरा पंचनामा

महाविकास आघाडीकडून मुंबईतील सहा उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. महाविकास आघाडीने सहा मराठी तर भाजप- शिंदे गटाचे चार मराठी उमेदवार मैदानात उतरविले आहेत. यात आता कोणाचे नशीब साथ देणार हे 4 जूनला स्पष्ट होईल.

महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मुंबईतील सहा मतदार संघासाठी कोणाला संधी देण्यात आली आहे. ते पाहूया..

महाविकास आघाडीचे उमेदवार : दक्षिण मुंबईत विद्यमान खासदार अरविंद सावंत हे उद्धव सेनेचे उमेदवार आहेत. उद्धव ठाकरे गटाकडून दक्षिण मध्य मुंबसाठी अनिल देसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर-मध्य मुंबईत काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड उमेदवार असणार आहेत. उत्तर पश्चिम मुंबईतून ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर उमेदवार आहेत. उत्तर मुंबईत काँग्रेसने भूषण पाटील यांना मेदवारी देण्यात आली आहे. उत्तर-पूर्व मुंबईतील उद्धव सेनेचे उमेदवार संजय दिना पाटील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे.

महायुतीचे उमेदवार : भाजपकडून हिंदी भाषिक असलेलेल पीयूष गोयल यांना उत्तर मुंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर-पूर्व मुंबईतून गुजराती भाषिक असलेल्या मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. अॅड. उज्ज्वल निकम यांना उत्तर-मध्य मुंबईतून भाजपने उमेदवारी दिली आहे. शिंदे गटाचे रवींद्र वायकर उत्तर-पश्चिम मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. दक्षिण-मध्यतून मुंबई राहुल शेवाळे यांना उमेदवारी दिली आहे. दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.