Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अवघ्या २० रुपयांच्या वादात फोडले नाक, मारहाण करणाऱ्या पीएसआयवर गुन्हा दाखल

अवघ्या २० रुपयांच्या वादात फोडले नाक, मारहाण करणाऱ्या पीएसआयवर गुन्हा दाखलवसई : खरा पंचनामा

अवघ्या २० रुपयांसाठी चावी बनविणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण करून त्याचे नाक फोडणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर अखेर माणिकपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजशेखर सलगरे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. घटना घडून १० दिवस उलटून गेल्यानंतरही पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते.

मोह्ममद अली अहमद अली अन्सारी (३५) यांचे वसईत चावी बनविण्याचे दुकान आहे. १६ मे रोजी अन्सारी यांच्या दुकानात एक इसर चावी बनविण्यासाठी आला होता. दोन चावी बनविण्याचे ८० रुपये झाले होते. मात्र त्याने केवळ ६० रुपये दिले. ठरलेल्या रकमेपैकी २० रुपये कमी दिल्याने अन्सारी आणि त्या ग्राहकात वाद झाला. शेवटी प्रकरण माणिकपूर पोलीस ठाण्यात गेले. तेथे असलेले पोलीस उपनिरीक्षक राजशेखर सलगरे यांनी फिर्यादी मोह्मद अन्सारी यांच्या मारहाण केली आणि त्यांच्या नाकावर जोराद ठोसा मारला. त्यामुळे अन्सारी यांचे नाक फॅक्चर झाले होते.

पोलिसांच्या या दादागिरीमुळे संतापाची लाट उसळली होती. फिर्यादी अन्सारी यांना जबर दुखापत होऊनही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. सोमवारी वंचित बहुजन आघाडीचे पालघर जिल्हाध्यक्ष सुमित पवार यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात ठाण मांडले. मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला. त्यामुळे पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक राजशेखर सलगरे यांच्या विरोधात ३२५, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.