Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'मराठी लोकांनी इथं येऊ नये'

'मराठी लोकांनी इथं येऊ नये'



मुंबई : खरा पंचनामा

नुकताच राज्यात मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आलाय. १०५ हुताम्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिल्यानंतर महाराष्ट्र राज्य स्थापन झालं. पण याचं मराठी भाषिकांच्या राज्यात मराठी तरुण तरुणींना नोकरी नाकारली जात असल्याचं धक्कादायक वास्तव पुढे आलंय.

मराठी लोकांना इथं स्थान नाही असं एका जाहीरातीमध्ये म्हटल्याने मोठा वाद उफाळून आलाय. शेवटी हे प्रकरण तापल्यानंतर याप्रकरणी माफी मागण्यात आली. मराठी दिग्दर्शक अक्षय इंडीकरनेही हा प्रकार समोर आणत आपला रोष व्यक्त केला.

एका एचआर रिक्रूटरने लिंक्डइनवर पोस्ट केलेल्या नोकरीच्या जाहीरातीमुळे सोशल मीडियावर नाराजी पसरली. गुजरातमधील एका फ्रीलान्स एचआर रिक्रूटरने ग्राफिक डिझायनरच्या भूमिकेसाठी मुंबईत नोकरीची जाहीरात तिच्या लिंक्डइन प्रोफाईलवर शेअर केली होती. पण धक्कादायक बाब म्हणजे या जाहीरातीमध्ये एचआरने "येथे मराठी लोकांचे स्वागत नाही" असे लिहिले होते. या सगळ्या प्रकारामुळे नेटकऱ्यांनी रोष व्यक्त केला.

"मुंबईत मराठी माणूस चालणार नाही हे जाहीर लिहणारी माणसं ? मराठी माणसांना मत मागणाऱ्या सगळ्या पक्षाकडून जबरी दखल घेण्याची अपेक्षा ... तरीही नागरिक म्हणून आपण खपवून घेतोय ? एवढा तिरस्कार ? शेयर करा आणि योग्य ती दखल घ्यायला भाग पाडा," असे अक्षय इंडीकरने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर संबंधित एचआरने माफी मागितली आहे. "मी खरोखर माफी मागते. काही दिवसांपूर्वी मी ग्राफिक डिझायनर जॉब ओपनिंग पोस्ट पोस्ट केली होती आणि एका आक्षेपार्ह वाक्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. तुम्हाला कळवायचे आहे की मी अशा गोष्टींना समर्थन देत नाही ज्यामध्ये कोणाशीही भेदभाव होईल. हे माझ्या दुर्लक्षामुळे झाले," असे या एचआरने म्हटलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.