Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जयंत पाटील मतदान करून गेले आणि कार्यकर्ते भिडले!

जयंत पाटील मतदान करून गेले आणि कार्यकर्ते भिडले!



सांगली : खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान सुरू आहे. यामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. दरम्यान हातकणंगलेमधून मोठी बातमी समोर आली आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या इस्मामपूरमधील साखराळे गावात महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं.

महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला आहे. विशेष म्हणजे याच मतदान केंद्रावर राडा होण्याच्या काही वेळ आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर काही वेळातच या ठिकाणी मतदान केंद्रामध्ये बोगस मतदान प्रतिनिधी महाविकास आघाडीकडून बसवण्यात आल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.

महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले. त्यांच्यामध्ये जोरदार वाद झाला. हाणामारीची घटना देखील घडली आहे. या सर्वप्रकारामुळे मतदान केंद्रावर काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. या ठिकाणची मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पुन्हा एकदा सर्व प्रक्रिया सुरळीत सुरू केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.