Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बुधगावमध्ये लॅपटॉप लंपास करणाऱ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांला अटक दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली ग्रामीण पोलिसांची कारवाई

बुधगावमध्ये लॅपटॉप लंपास करणाऱ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांला अटक दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली ग्रामीण पोलिसांची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

मिरज तालुक्यातील बुधगाव येथे महाविद्यालयीन तरुणांची घरे फोडून लॅपटॉप लंपास करणाऱ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीचे दीड लाखांचे दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. सांगली ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. शेअर बाजारात नुकसान झाल्याने ते भरून काढण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्यावर पोलिसांनी यापूर्वीही गुन्हा दाखल केला होता.

धनाजी जानेश्वर जाधव (वय २०, रा. बलगवडे, ता. तासगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. बुधगाव येथील महावि‌द्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी येथे भाड्याच्या घरात राहतात. संशयित धनाजीही बुधगाव येथील इंजिनिअरिंग महाविद्‌यालयात बीटेकच्या दुसन्या वर्षात शिकत आहे. संशयित धनाजी जाधव याने त्याच्या शेजारीच राहणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचे लॅपटॉप घर फोडून बोरून नेले होते याबाबत तातडीने तपास करून संशयिताला अटक करण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या.

पथकाने या चोरीबाबत माहिती घेतल्यानंतर ही चोरी धनाजी जाधव याने केल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने बुधगाव येथे सापळा रचून धनाजी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचे दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले. शेअर बाजारातील नुकसानीमुळे त्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. त्याला दुसऱ्यांदा अटक करण्यात आली आहे.

सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, सांगली ग्रामीणचे पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक सुशांत पाटील, महेश जाधव, मेघराज रूपनर, मनोज निळकंठ, बंडू पवार, यासीन फकीर आदीच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.