Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार



पुणे : खरा पंचनामा

पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत कल्याणी नगर परिसरात धडक दिल्यामुळे दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. यात एका मुलाचा आणि एका मुलीचा समावेश आहे. हा अपघात शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याणीनगर येथे घडला.

ब्रह्मा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर या बांधकाम कंपनीचे मालक विशाल अगरवाल यांचा मुलगा वेदांत अगरवाल याने अत्यंत बेदरकारपणे त्याची आलिशान गाडी चालवीत रस्त्यावरील वाहनांना धडक दिली आहे. कारचालक असलेल्या 17 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्रांच्या सोबत बॉलर हॉटेलमध्ये पार्टी करुन घरी परत जात होते. कल्याणीनगर-एअरपोर्ट रोडवर ग्रे कलरच्या गाडीने दोन्ही बाजूस नंबरप्लेट नसलेल्या कार चालकाने त्याच्या ताब्यातील चारचाकी गाडी भरधाव वेगाने अनिस अवधिया याच्या दुचाकीला (एम.एच. 14 सी क्यु 3622) पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात अनिस अवधिया व मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला.

या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकिब रमजान मुल्ला याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अनिस आणि अश्विनी यांचा मित्र एकीब रमजान मुल्ला यांनी फिर्याद दिली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.