ब्रिजभूषण सिंह विरोधात सबळ पुरावे हाती!
कोर्टाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश
दिल्ली : खरा पंचनामा
दिल्ली न्यायालयाने भाजपचे नेते आणि भारतीय कुस्ती महासंघाचा माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह याच्याविरूद्ध पाच महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा नोंद करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे.
दिल्ली कोर्टाने ब्रिजभूषणविरूद्ध विनयभंगाचा देखल गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहे. दिल्ली कोर्टाने सांगितले की ब्रिजभूषणविरूद्ध गुन्हा दाखल करण्याइतके सबळ पुरावे आहेत.
ब्रिजभूषणविरूद्ध कलम 354 आणि 354 अ अंतर्गत गुन्हे दाखल करा असा आदेश दिल्ली कोर्टानं दिला आहे. मात्र याचबरोबर सहाव्या महिलाकुस्तीपटूने केलेल्या आरोपांमधून कोर्टाने ब्रिजभूषणची निर्दोष मुक्तता केली आहे.
दिल्ली कोर्टाने भारतीय कुस्ती महासंघाचा माजी सचिव विनोद तोमर याच्याविरूद्ध देखील महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहे.
ब्रिजभूषण शरण सिंह याच्याविरूद्ध सहा महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप करत तक्रार दाखल केली होती. भारतीय कुस्ती महासंघाचा माजी अध्यक्ष असलेल्या ब्रिजभूषण याच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी जंतर मंतरवर आंदोलन देखील केलं होतं. यात विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया हे भारताचे प्रसिद्ध कुस्तीपटू आघाडीवर होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.