मराठा समाजाच्या दुकानांतून खरेदी न करण्याचा निर्णय
बीड येथील वंजारी समाजाचा अजब ठराव
बीड : खरा पंचनामा
बीड जिल्ह्यातील वंजारी समाजबहुल दोन गावांनी मराठा समाजाच्या दुकानांतून कोणतीही वस्तू खरेदी न करण्याचा ठराव केला. मात्र, या ठरावामुळे बीड जिल्ह्यात जातीय संघर्ष वाढल्याचे दिसून येत आहे.
मात्र, नेमक कशामुळे दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला? नेमकं कोण विष कालवत आहे? या सुषंगाने बीड जिल्ह्यात अनेक चर्चा रंगल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या जातीय संघर्षाचे परिणाम बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जाणवत आहेत.
दरम्यान, १७ मे २०२४ रोजी सकाळी १० वाजता वंजारी समाजाची मुंढेवाडीमध्ये गावातील मंदिराच्या पारावर बैठक झाली. या बैठकीत वंजारी समाजातील लोकांनी अजब ठराव केला, ज्यात मराठा समाजाच्या दुकानावर जायचे नाही, मराठा समाजाच्या किर्तनकाराला किर्तनाला बोलवायचे नाही, मराठा समाजाच्या बियर बारवर जायचे नाही, मराठा समाजाच्या चहाच्या हॉटेलवर जायचे नाही, जो कोणी हा नियम मोडेल, त्याला ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आलाय. मात्र, या ठरावामुळे वंजारी आणि मराठा समाजात वाद पेटण्याची शक्यता आहे. बीडमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बीडचे पोलीस प्रशासन सतर्क झाले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.