पुणेकर बिबटे आता 'गुजराती' होणार
पुणे : खरा पंचनामा
जुन्नर आणि शिरूरसह आजूबाजूच्या तालुक्यात बिबट्यांचा मोठा वावर झाला आहे. एकाच महिन्यात पाच जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. जुन्नर तालुक्यातील लोकांना घरातून बाहेर पडताना जीव मुठीत धरून बाहेर पडावे लागत आहे.
पुणे जिल्ह्यातील १० बिबटे आता गुजरातच्या जामनगर येथील सेंट्रल झु-मध्ये स्थलांतरित केले जाणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. गुजरातमध्ये बिबट्याच्या वास्तव्यासाठी उपाययोजना तयार करण्यात आल्यात त्यासाठीची केंद्राची परवानगीही मिळाली आहे. त्यामुळे आता जुन्नरचा बिबट गुजरातच्या जामनगर येथील सेंट्रल झूमध्ये पाठवला जाणार आहे.
अमोल कोल्हे यांनी या निर्णयाचे स्वागत करत उर्वरित बिबट्यांचे काय असा सवाल उपस्थित केला आहे. बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी ठोस निर्णय व्हावा याकरता
मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांची तातडीने भेट घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. "बिबट्याचे हल्ले कमी व्हावे, यासाठी उपाययोजना करायला हव्यात आणि राज्य आपत्ती घोषित करण्यात यावी त्यामुळे योग्य निधी मिळेल." असे कोल्हे यांनी म्हंटले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.