Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दादांच्या पुण्यात फडणवीस हालवतायेत सूत्रं पोर्शे अपघात प्रकरणात कारवाईला वेग

दादांच्या पुण्यात फडणवीस हालवतायेत सूत्रं
पोर्शे अपघात प्रकरणात कारवाईला वेगमुंबई : खरा पंचनामा

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण नवनवे वळण घेतो आहे. या घटनेच्या तपासाला गती मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणात एकापाठोपाठ एक नवीन खुलासे होतायेत. या प्रकरणाला दडपलं जात असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात होते.

गृहखाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे फडणवीसांवर टीकेची झोड उठवली होती. विरोधक तथ्य वेगळ्या पद्धतीने मांडत असल्याचं बोललं गेलं. फडणवीसांनी पुणे गाठत अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. यंत्रणेला कामाला लावलं. यानंतर तपासाला अधिक वेग आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी फॉरेन्सिक विभागाच्या प्रमुखांना अटक केली.

या गंभीर अपघातानंतर आरोपीला बाल गुन्हेगार बोर्डाने आरोपीला किरकोळ शिक्षा सुनावली होती. ३०० शब्दांचा निबंध लिहणे, ट्राफिक पोलिसांना मदत करणे वैगेरे शिक्षा होत्या. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेतला. आरोपीचे वय १७ वर्षे ८ महिने आहे. गंभीर गुन्ह्यांसाठी आरोपीचं बालवयीन असण्याकडे दुर्लक्ष करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मृत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयाच्या बाजूने ते उभे राहिले. अजित पवार पुणे जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री आहेत. मात्र, अजित पवारांनी पुढं येवून हे प्रकरण हाताळलं नसल्याचं बोललं गेलं. या उलट फडणवीसांनी सुत्रं हाती घेतली. बाल गुन्हे मंडळाची शिक्षा रद्द केली. नव्याने गुन्हे दाखल करायला लावले.

तपासात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन केलं. आता डॉक्टराचे निलंबन झालं आहे. शिवाय आरोपीचे आजोबांवरील आरोपांच्या जुन्या फाईल्स उघडण्यात आल्यात. विशाल आग्रवल या आरोपींच्या वडीलांना अटक झालीये. त्यामुळं दादांच्या पुण्यात फढणवीसांनी सुत्रं हातात घेतल्याचं बोललं जातंय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.