Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मद्यधुंद पोलिसाने मतदान केंद्रावर घातला गोंधळ

मद्यधुंद पोलिसाने मतदान केंद्रावर घातला गोंधळ



धाराशिव : खरा पंचनामा

धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील कुंभेफळ येथील मतदान बूथवर पोलिस कर्मचाऱ्याने दारू पिऊन मोठा गोंधळ घातला आहे. या प्रकरणी त्या पोलीस कर्मचाऱ्यावर परडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी बंदोबस्तासाठी असणारे हवालदार शंकर जयराम डोंगरे (राहणार मालेगाव, जिल्हा नाशिक) यांनी दारूच्या नशेत मतदान केंद्रावर गोंधळ घातला. त्यावेळी ग्रामस्थांची देखील मतदान केंद्रावर मोठी गर्दी होती. परंडा पोलिसांनी शंकर डोंगरे याच्यावर पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.