Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुणे-डोंबिवली प्रकरणाने राजकारण तापले, फडणवीस बॅकफूटवर!

पुणे-डोंबिवली प्रकरणाने राजकारण तापले, फडणवीस बॅकफूटवर!



पुणे : खरा पंचनामा

पुण्याचा श्रीमंत बिल्डर विशाल अग्रवाल यास मुलाच्या हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी संभाजीनगरातून अटक केल्यानंतर तिन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या अपघातात दोघे ठार झाल्याने आणि पोलिस अधिकारी आरोपीला वाचवण्याच्या प्रयत्नात असल्याच्या वृत्ताने पुण्यात पोलिस यंत्रणेबद्दल प्रचंड राग व्यक्त झाला.

हा राग व्यक्त होत असतांना असाच प्रयत्न भाजप नेते मंडळी करत असल्याचा दुसरा आरोप काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी केला. पोलिस यंत्रणेने करोडो रुपये घेतल्याचा गंभीर आरोप धंगेकर यांनी केला दरम्यान अपघातास कारणीभूत बिल्डर पुत्र अल्पवयीन असल्याने त्याच्याबाबत बाल हक्क न्यायालयाने दिलेल्या जामीनाबाबतही रोष व्यक्त करण्यात आला. या बाल हक्क न्यायालयास कथित जामीनाचा फेर विचार करावा अशी मागणी करण्यात आल्याचे म्हटले गेले. याच प्रकरणात प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केल्याचे देखील म्हटले गेले.

सन 2009 मधे विधानसभा निवडणूका लढवणारे अजय भोसले यांच्यावर गोळीबार झाला होता. या भोसलेंच्या म्हणण्यानुसार राम, सुरेंद्र आणि विशाल या भावांची गुन्हेगारी पार्श्वभुमी, पोलिस स्टेशनमधे रिपोर्ट तपासावे. आ. धंगेकर आणि खा. संजय राऊत या दोघांनी पुणे पोलिस आयुक्तांना तात्काळ बडतर्फ करा अशी मागणी केली. धंगेकरांच्या आरोपानुसार तपास अधिका-यांमार्फत करोडोंची धनराशी वरिष्ठ पातळीपर्यंत गेली. पुण्यातल्या बेकायदा पब्ज, बियर बार, मद्य व्यवसाय, बिल्डर्स यात भाजपवाल्या राजकारण्यांच्या सहभाग असल्याचा आरोप आहे. पोलिस आयुक्तांना तात्काळ निलंबीत करुन चौकशी करावी अशीही मागणी होत आहे.

कथित श्रीमंत अपराध्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पुण्यासह राज्यभरातून प्रचंड संताप व्यक्त झाला. त्यानंतर उप मुख्यमंत्री फडणविसांनी पुण्यात धाव घेत बाल हक्क न्यायालयात फेर अपील दाखल करता येईल अशी सुचना केली. त्यानंतर त्याचा जामीन रद्द करुन बाल सुधारगृहात रवानगी करण्याचा कोर्टाचा निर्णय आला. परंतु यामुळे केवळ पोलिसच नव्हे तर गृहमंत्री देखील बॅक फुटवर आल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणीही रेटण्यात आली. तिकडे डोंबिवलीत केमिकल कंपनी स्फोटात सात लोक ठार झाले. तरी सध्याचे राजकारण पाहता फडणविसांचा तसेच या प्रकरणात गृह, विधी - न्याय खातेही फडणविसांकडे आहे. मुख्यमंत्र्यांकडे परिवहन तर शंभुराज देसाईकडे राज्य उत्पादन शुल्क खाते आहे. त्यामुळे हे तिन नेते आरोपांच्या टप्प्यात आले आहेत. पुणे मनपा हद्दीतील दारु परवाने, बेकायदा पब, पोलिस विभाग या सर्वांचा भ्रष्टाचार गाजतोय. पुणेकरांनी जोरदार आवाज उठवल्याने श्रीमंत आरोपीच्या मुलाचा जामीन रद्द होऊन बालसुधार कोठडी मिळाली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.