Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ठाकरे गट आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; जोरदार घोषणाबाजी

ठाकरे गट आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; जोरदार घोषणाबाजीछत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा

संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याचं देखील पाहायला मिळालं. या सर्व प्रकारामुळे तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांकडून दोन्ही गटाला समजवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या नेत्यांना एकाच वेळी रॅलीची परवानगी देण्यात आली होती. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते क्रांती चौकात आमनेसामने आले. त्यामुळे तणाव निर्माण झाला. दोन्ही गटांकडून जोरजार घोषणाबाजी सुरु झाली. कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केल्याची देखील माहिती आहे. या सर्व प्रकारामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. कार्यकर्त्यांना समजावण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे हे देखील रॅलीमध्ये सहभागी झाले होते. दानवे आणि कार्यकर्त्यांनी दारुच्या रिकाम्या बाटल्या रॅलीमध्ये आणल्या होत्या. यावेळी विरोधी गटाकडे पाहून घोषणाबाजी झाली. दोन्ही गटामध्ये बाचाबाची सुरु झाली. दानवे म्हणाले की, आमच्या कार्यकर्त्यांना कोणी धक्का लावला तर आम्ही सोडणार नाही. त्याचे हात तोडण्यात येतील. आम्ही शांत बसणार नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.