Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कराड विमानतळाजवळ पोलिसांच्या गाडीला अपघात; तुरची प्रशिक्षण केंद्रातिल तीन पोलीस जखमी

कराड विमानतळाजवळ पोलिसांच्या गाडीला अपघात; तुरची प्रशिक्षण केंद्रातिल तीन पोलीस जखमीकराड : खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकीचा पाटण (जि. सातारा) येथून बंदोबस्त संपवून परतत असताना कराड तालुक्यातील विमानतळाजवळ आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. त्यामध्ये तासगाव तालुक्यातील तुरची येथील पोलीस ट्रेनिंग सेंटरमधील तीन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातील पाटण विधानसभा मतदारसंघात चार दिवसांपासून संबंधित पोलीस कर्मचारी हे बंदोबस्तावर होते. लोकसभेचे काल मतदान संपल्यानंतर आज सकाळी खासगी ट्रॅव्हल्समधून ते 33 कर्मचारी तुरचीकडे रवाना होण्यासाठी निघाले होते.

त्यांची ट्रॅव्हल्स विमानतळाजवळील एका ढाब्याजवळ आली असता, आयशर टेम्पो आडवा आल्याने अपघात झाला. त्यामध्ये ट्रॅव्हलच्या पुढील बाजूस बसलेले तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी कराडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कराड पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर, कराड शहर पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.