मंत्र्याकडून नियमबाह्य कामांसाठी दबाव!
निलंबित अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांना लिहीले पत्र
पुणे : खरा पंचनामा
महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ प्रकरणी आणि विभागातंर्गत आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांना निलंबित करण्यात आलं आहे.
राज्याच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून हि कारवाई करण्यात आली आहे. या निलंबित काळात त्यांची बदली नंदुरबारच्या जिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे. आता याप्रकरणी डॉ. भगवान पवार यांनी गंभीर आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.
डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव आणि अप्पर मुख्य सचिव यांचा उल्लेख केला आहे. यात त्यांनी मंत्री महोदयांनी मला कात्रज कार्यालयात बोलावून नियम बाह्य टेंडरची काम करण्यास सांगितली. त्यासोबतच इतर खरेदी प्रकरणात दबाव आणला. पण मी नियम बाह्य काम केली नाहीत म्हणून माझं निलंबन करण्यात आलं आहे, असा आरोप डॉ. भगवान यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
भगवान पवार यांनी त्यांच्या बदलीच्या आदेशाला आव्हान दिले होते. त्यानंतर मॅटने भगवान पवार यांना पुन्हा आरोग्य प्रमुख म्हणून नियुक्त केलं. दरम्यान, त्यांच्यावर सेवेतील कामात अनियमितता आणि सहकाऱ्यांना त्रास देण्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई केली गेली. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभाग प्रमुख पदी नियुक्तीनंतर साडेतीन महिन्यातच त्यांची बदली केली गेली होती. या बदलीविरोधात मॅटकडे पवार यांनी दाद मागितली. पण आरोग्य मंत्र्यांच्या आदेशालाच आव्हान दिल्यानं पवार यांनी जिथे सेवा केली तिथे तिथे त्यांची चौकशी केली गेली. त्यानंतर पवार यांच्याविरोधात अहवाल तयार करून तो राज्य सरकारकडे सादर केला गेला. यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.