Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मतदानाच्या टक्केवारीवरून नवा वाद!

मतदानाच्या टक्केवारीवरून नवा वाद!मुंबई : खरा पंचनामा

देशभरात लोकसभा निवडणूक सात टप्प्यात पार पडत असून मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाकडून मतदारांना अनेक मार्गांनी आवाहन करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे नुकत्याच पार पडलेल्या दोन टप्प्यातील मतदानाची टक्केवारी निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यानंतर 11 दिवसांनी आणि दुसऱ्या टप्प्यानंतर 4 दिवसांनी जाहीर केली आहे.

ही आकडेवारी आयोगाने आधी जाहीर केलेल्या मतदानाहून 3 ते 5.75 टक्के अधिक आहे. तसेच इतका उशीर आजवर कधीही झाला नव्हता. तसेच मतदानाचे प्रत्यक्ष आकडे देण्याऐवजी निवडणूक आयोगाने टक्केवारी दिली आहे. हे सर्वच संशयास्पद असल्यामुळे विरोधकांना निवडणूक आयोगाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

निवडणूक आयोगाने दोन टप्प्यातील एकूण मतदान आकडेवारी अॅप वर दाखवण्याचा प्रयोग पहिल्यांदा केला आहे. संपूर्ण निवडणूक कार्यक्रम निष्कर्षाप्रत येण्यापूर्वी अंतिम आकडेवारी जाहीर करण्याचा हा पहिला प्रयोग असल्याचं कळतंय. मात्र मतदानाची आकडेवारी उशिरा जाहीर केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठताना दिसत आहेत. भाजपाने आकडेवारी वाढल्याबद्दल स्वागत केले आहे, तर दुसरीकडे विरोधक मतदानाच्या अंतिम आकडेवारीवर टीका करत आहेत. निवडणूक आयोगाने मतदानाची आकडेवारी जाहीर केली मात्र अंतिम आकडेवारीतील फरकावर बोट ठेवत अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवली आहे. तसेच निवडणूक आयोगाने आकडेवारी जाहीर करायला अकरा दिवस लावले यावरून राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनीही टीका केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.