'अजित पवारानी नागपूरला यावं नाहीतर मी बारामतीमध्ये येतो अन्...'
पुणे : खरा पंचनामा
'याला मंत्री होण्याची स्वप्न पडतात. पण मंत्री होण्याआधी तू आमदार कसा होतो, तेच बघतो', असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुर मतदारसंघातील सभेत थेट आमदार अशोक पवार यांना चॅलेंज दिले.
त्यावरून अजितदादांना फार पूर्वीपासून दम देण्याची सवय आहे. ती त्यांची पद्धत आहे. त्यांच्या पक्षातील सर्वांना त्याची सवय झाली आहे. त्यामुळे फारसा परिणाम होणार नाही, असे म्हणत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी अजित पवारांना टोल लगावला. तर, काँग्रेस आमदार सुनील केदार यांनी अजित पवारांना ओपन चॅलेंज दिले.
'हा कसा निवडून येतो, तो कसा निवडून येतो, असं म्हणून कॉलर पकडून मत मिळत नाहीत. जर निवडून कसा येतो, हे बघायचं असेल तर त्यांनी नागपूरला यावं. नाहीतर मी बारामतीमध्ये येतो.', अस म्हणत आमदार सुनील केदार यांनी अजित पवारांना ओपन चॅलेंज दिले.
अजित पवारांच्या अशोक पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर शरद पवार गटातील नेत्यांकडून अजित पवारांवर टीका करण्यात येत आहे. आमदार रोहित पवार यांनी अशोक पवार यांची भेट घेत 'स्वाभिमानी जनता आणि याच निष्ठावंत कार्यकर्त्यांची साथ असल्याने कसे निवडून येत नाहीत हेच आम्ही पाहतो.', असे ट्विट करत अजित पवारांना टोला लगावला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.