एक कोटीची लाच, फरार पोलीस निरीक्षक अखेर आला शरण!
बीड : खरा पंचनामा
बीड पोलीस दलातील एक कोटीची लाच मागणारा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे अखेर शरण आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला हरिभाऊ खाडे याच्या चाणाक्यपुरी येथील घरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला (एसीबी) घबाड मिळून आले.
एसीबीला एक कोटी आठ लाख ७६ हजार रुपये रोख, ७२ लाखांचे सोन्याची बिस्किटे आणि सोने, चार लाखांची साडे पाच किलो चांदी मिळून आली आहे. 15 मे रोजी एक कोटीच्या लाचेतून पाच लाख घेताना एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत विभागाने अटक केली होती. त्यानंतर हरिभाऊ खाडेचा सोध घेत होते. अखेर खाडे एसीबी पोलिसांना शरण आले आहे.
जिजाऊ मल्टिस्टेट पथसंस्थेच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एक कोटीची लाच हरिभाऊ खाडे याने मागितली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईनंतर पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे, फौजदार आर. बी. जाधवर हे फरार झाले. त्यांच्या शोध घेण्यासाठी पोलिसांचे तीन पथके नेमली होती.
लाचखोर फरार पोलीस निरिक्षक हरिभाऊ खाडे एसीबी समोर शरण आला आहे. खाडेला पकडण्यासाठी पोलिसांचे तीन पथक फिरत होते. आता चौकशीतून खाडेने जमवलेली अपसंपदा समोर येणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.