Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुण्याचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह ४० ते ५० जणांवर गुन्हा दाखल

पुण्याचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह ४० ते ५० जणांवर गुन्हा दाखलपुणे : खरा पंचनामा

पुणे लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीरपणे जमाव केल्याप्रकरणी धंगेकर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

मतदानाच्या एक दिवस अगोदर रविवारी (१२ मे) रवींद्र धंगेकर यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यासमोर जावून आंदोलन केले होते. सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला होता. तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचे सांगत सहकारनगर पोलीस ठाण्यातच त्यांनी ठिय्या आंदोलन केले होते. आता त्या आंदोलनामुळे धंगेकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कलम १४३, १४५, १४९, १८८ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५, लोकप्रतिनीधी अधिनियम १९५१ चे कलम १२६ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले.

जमावबंदीचे उल्लंघन करत आंदोलन केल्याप्रकरणी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह ४० ते ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोपर्यंत पोलीस पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत तोपर्यंत पोलीस ठाण्यातून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा धंगेकरांनी घेतला होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.