Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने दुचाकीस्वाराला चिरडले!

पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने दुचाकीस्वाराला चिरडले!



पुणे : खरा पंचनामा

पोलीस पाटलाच्या एका अल्पवयीन मुलीने एका दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना समोर आली आहे. शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील ही घटना आहे. अल्पवयीन मुलगी पीकअप चालवत होती. तिने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

पुण्याचे हिट एंड रन प्रकरण चांगलेच गाजत आहेत. त्यातच आता शिरुरच्या अरणगाव येथे ही घटना घडल्याने याची चर्चा होऊ लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीने अरुण मेमाणे या तरुणाला चिरडले आहे. त्याचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.

अल्पवयीन मुलगी गाडी चालवत असताना वडील पोलीस पाटील संतोष लेंडे हे बाजूलाच बसले होते. लेंढे कुटुंबीय मालवाहतूक टेम्पो घेऊन जात होते. यावेळी गाडीमध्ये आई- वडील, मुलगा आणि मुलगी होते. त्यावेळी मुलीला गाडी चालवण्यात देण्यात आली होती. तिने रस्त्यावरील दुचाकीस्वाराला धडक दिली. तिने तरुणाला ४० ते ५० मीटर फरफटत नेले असल्याची माहिती आहे. यात आणखी एक तरुण जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

जखमी तरुणाचे नाव महिंद्र बांडे असल्याचं कळतंय. तो गंभीर जखमी आहे. अपघात अरणगावच्या शिवारात घडला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.