अखेर २४ तासांनंतर पोलिसपुत्रावर गुन्हा दाखल
पिंपरी : खरा पंचनामा
पायी रस्ता ओलांडत असताना महिलेला मोटारीने जोरात धडक दिली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी चालक असलेल्या पोलिसपुत्रावर गुन्हा दाखल केला. रेखा जीवाराम चौधरी (वय ४०, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
त्यांचे पती जीवाराम चौधरी यांनी फिर्याद दिली. विनय विलास नाईकरे (वय २३, रा. मोशी) या मोटार चालकावर गुन्हा दाखल झाला. फिर्यादी यांच्या पत्नी रेखा आणि मुलगी बुधवारी दुपारी मोशीतील स्वराज रेसिडेन्सी समोर रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी आरोपीच्या मोटारीने रेखा यांना धडक दिली. त्या हवेत उडून रस्त्यावर पडल्या.
मोटारचालक आरोपीचे वडील विलास नाईकरे हे पोलिस असून, सध्या एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यातच त्यांची नियुक्ती आहे. अपघातानंतर २४ तास उलटूनही गुन्हा दाखल झाला नव्हता. अखेर सोशल मीडियावर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.