Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आता बार काउंटरवर राहणार 'वॉच' सीसीटीव्हीद्वारे पोलिस, एक्साइजची राहणार नजर

आता बार काउंटरवर राहणार 'वॉच' सीसीटीव्हीद्वारे पोलिस, एक्साइजची राहणार नजरमुंबई : खरा पंचनामा

मद्यपुरवठा करणारी जागा म्हणजे बार काउंटर येथे सीसीटीव्ही बसविणे हॉटेलचालकांना बंधनकारक करण्यात आले आहे. त्यांचे थेट प्रक्षेपण आता पोलिस स्टेशन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांना होणार आहे.

एवढेच नव्हे, तर शहराच्या हद्दीबरोबरच हद्दीबाहेरील दहा किलोमीटर अंतरापर्यंतच्या हॉटेलांना हे नियम बंधनकारक करण्यात आले आहेत.

कल्याणीनगर येथील दुर्घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत विनापरवाना मद्य विक्री, वेळेचे बंधन न पाळणे, परवाना दिलेल्या जागा सोडून अन्यत्र मद्यविक्री करणे, अल्पवयीन मुलांना मद्याची विक्री करणे, अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. अपुऱ्या मनुष्यबळामुळे त्यांच्यावर नियंत्रण आणणे शक्य नाही.

त्यामुळे त्यावर उपाय म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्यातील सर्व प्रमुख शहरे आणि त्या शहरांच्या दहा किलोमीटर पर्यंतच्या परिसरातील हॉटेल, पब, मद्यविक्री करणारे रेस्टॉरंट यांच्यासह सर्वांना बार काउंटर येथे दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले आहेत.

बार काउंटरवर दोन बुलेट कॅमेरे बसविणे बंधनकारक. बॅकअपची सुविधा असणे आवश्यक. पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला थेट प्रक्षेपण होईल, अशी सुविधा आवश्यक. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे चित्रीकरणाचे विश्लेषण करण्यासाठी विशिष्ट सॉफ्टवेअरची सुविधा हवी. वेळेचे उल्लंघन होत असल्यास त्यांची तत्काळ सूचना देणारे मेसेज पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाला मिळणार, अशी सुविधा. या यंत्रणेची आठवड्यातून दोन वेळा पाहणी करण्याची जबाबदारी उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांवर राहील. यंत्रणा नादुरुस्त असल्यास त्यांची नोंद परवानाधारकांच्या पुस्तिकेत करावी. ती तत्काळ परवानाधारकांकडून दुरुस्त करून घ्यावी. थेट कार्यालयातून प्रक्षेपण पाहता येईल अशी सुविधा सर्व अधीक्षकांनी कार्यालयात निर्माण करावी. आदेशानुसार कार्यवाही झाली की नाही, याची माहिती तत्काळ आयुक्तांना अहवालाद्वारे कळवावी असे आदेशात म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.