Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

काँग्रेस १०० ते १०५ जागा, ठाकरे गट ९० ते ९५, शरद पवार गट ८० ते ८५ जागा, विधानसभेचा आघाडीचा फॉर्म्युला जाहीर ?

काँग्रेस १०० ते १०५ जागा, ठाकरे गट ९० ते ९५, शरद पवार गट ८० ते ८५ जागा, विधानसभेचा आघाडीचा फॉर्म्युला जाहीर ?मुंबई : खरा पंचनामा

विधानसभा निवडणुकीला ४ महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला आहे. मात्र त्याआधी तयारीला वेळ मिळावा म्हणून जागावाटप लवकर उरकण्याची महाविकास आघाडीची योजना असल्याची चर्चा आहे. त्याआधी आता विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा संभाव्य फॉर्म्युला देखील समोर आला आहे. यातच लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त १३ जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. त्यामुळे याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने पडती बाजू घेत फक्त १७ जागा लढविल्या होत्या. परंतु त्यातील जवळपास १३ जागा निवडून आणल्या. तर ठाकरेंच्या वाट्याला २१ जागा दिल्या होत्या. त्यातील फक्त ९ जागांवर यश मिळालं. तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने लढवलेल्या १० जागांपैकी ८ जागांवर विजय मिळवला आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यात काँग्रेस महाविकास आघाडीत मोठा भाऊ ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकसभेच्या एकूण २८८ जागांपैकी काँग्रेस १०० ते १०५ जागांवर निवडणूक लढवू शकते. तर ठाकरे गट ९० ते ९५ आणि शरद पवार गट ८० ते ८५ जागांवर लढण्याची शक्यता आहे. शनिवारी महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढण्याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती दिली.

पुणे जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदारसंघापैकी सहा विधानसभा मतदारसंघ स्वःतकडे ठेवण्याची तयारी पवार गट आणि ठाकरे गटाने वरिष्ठांकडे मागणी केलीय. यामध्ये कोथरूड, पर्वती, वडगाव शेरी, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा या मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा केलाय. तर हडपसर, वडगाव शेरी, शिवाजीनगर, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला मतदारसंघावर शरद पवार गटाने दावा ठोकला आहे.

दरम्यान, यातच आता विधानसभा जागावाटपाबाबत शरद पवारांची भेटीगाठी घेण्यास महाविकास आघाडीच्या नेत्यांची रिग लागली आहे. यातच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. महाविकास आघाडीतील विधानसभा जागा वाटपात सोलापूरमध्यसह राज्यातील १२ जागेची मागणी केलीय. माकपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांच्यासह इतर त्यांनी शरद पवारांसोबत चर्चा केलीय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.