'देवाच्या नावाखाली कोणी घरावर कोणी नांगर फिरवत असेल तर देव सुद्धा त्याला माफ करणार नाही..'
सांगली : खरा पंचनामा
नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग बांधण्याचे काम हाती घेतले असून यासाठी 27 हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध वाढत असून शक्तिपीठ महामार्ग तत्काळ रदद करण्याची मागणी शिंदे गटातील नेत्यांकडून केली जात आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात महायुतीला मोठा फटका बसला. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा तीच पुनरावृत्ती होऊ नये, शेतकऱ्यांचा रोष नको म्हणून सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी या महामार्गाच्या विरोधात आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित खासदारने आपल्या सरकारला घरचा आहेर दिला आहे.
शिंदे गटाचे नेते, खासदार धैर्यशील माने यांनी सांगलीत आंदोलकांना ग्वाही दिली आहे ते म्हणाले, 'शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटूच. पण संसदेमध्ये सुद्धा याबाबत आवाज उठवू" अशी ग्वाही त्यांनी आंदोलकांना दिली आहे. ते पुढे म्हणाले, 'देवांच्या नावाखाली आमच्या घरावर कोणी नांगर फिरवत असेल तर देव सुद्धा त्याला माफ करणार नाही.' असं म्हणत माने यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
तत्पूर्वी, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजप नेते समरजित घाटगे यांनीही शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 6 सहा तालुक्यातील शेतजमीन शक्तीपीठ महामार्गासाठी जाणार आहे. भुदरगड तालुक्यातील 21, आजरा तालुक्यातील 5, शिरोळ तालुक्यातील 5, हातकणंगले तालुक्यातील 5 करवीर तालुक्यातील 10 व कागल तालुक्यातील 13 गावातून शक्तिपीठ महामार्ग जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.