निवृत्त पोलिस निरीक्षकाचा हवेत चार वेळा गोळीबार
पुणे : खरा पंचनामा
खेड तालुक्यात एकत्रित असलेल्या जमिनीचा ताबा घेण्याच्या वादातून निवृत्त पोलिस निरीक्षक असलेल्या व्यक्तीने परवाना असलेल्या स्वतः च्या पिस्तुलातून चार वेळा गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
हि घटना रानमळा गावात शनिवारी २२ जून रोजी घडली. अनिल बाळकृष्ण शिंदे (रा. पुणे, मुळ रा. रानमळा) असे गोळीबार करणाऱ्या निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे.
निवृत्त पोलिस अधिकारी अनिल शिंदे याने त्याच्या बरोबर आलेल्या अजित उत्तम शिंदे, शाकुबाई वाघोले यांच्या विरोधात गोळीबार करून दहशत निर्माण केली. याप्रकरणी ओंकार अनिल शिंदे यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रार दाखल करणारे आणि गोळीबार करणारे एकाच भावकितील व्यक्ती आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, रानमळा येथील कडुस किवळे रस्त्या लगत २७६६ या गटात ५४ गुंठे क्षेत्र असलेली शिंदे परिवाराची जमीन आहे. ती जमीन नाथा हौशीराम शिंदे यांच्या ताब्यात आहे. शनिवारी दुपारी अनिल शिंदे व सहकारी या ठिकाणी आले. त्यांनी जेसीबीद्वारे या जमिनीतील झाडे झुडपे काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर निवृत्त पोलिस निरिक्षक अनिल शिंदे यांनी कमरेला लावलेले पिस्तुल काढून हवेत चार वेळा गोळीबार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.