Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा स्वीकारला जाणार? दिल्लीत उद्या होणार महत्वाची बैठक

देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा स्वीकारला जाणार? 
दिल्लीत उद्या होणार महत्वाची बैठकमुंबई : खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात बसलेल्या धक्क्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली होती. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मला मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मोकळं करा, असं फडणवीस म्हणाले होते, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेटही घेतली होती.

यानंतर आता फडणवीसांच्या राजीनाम्याच्या तयारीबाबत मोठी अपडेट समोर येत आहे.

महाराष्ट्रात झालेल्या पराभवानंतर आता दिल्ली भाजपमध्ये खलबतं सुरू होणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याबाबत उद्या महाराष्ट्र भाजप कोअर कमिटी दिल्लीत पक्षनेतृत्वाची भेट घेणार आहे. अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि महाराष्ट्र प्रभारी बीएल संतोष यांची महाराष्ट्र प्रदेश कोअर कमिटीसोबत दिल्लीत बैठक होणार आहे.

या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेबाबत चर्चा होणार आहे. सत्तेतून बाहेर पडल्याशिवाय संघटनेचं बळकटीकरण होणार नाही, यावर अजूनही देवेंद्र फडणवीस ठाम आहेत. आपली भूमिका पक्ष आणि संघटनात्मक बांधणीच्या फायद्याचीच आहे, हे पटवून देण्यावर देवेंद्र फडणवीस ठाम आहेत, त्यामुळे याबाबत आता उद्या दिल्लीत नेमका काय निर्णय होणार? यावर महाराष्ट्राचं पुढचं राजकारण अवलंबून आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.