Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भेंडवडेतील तरुणाचा सांगलीत निर्घ्रुण खून; कारण अस्पष्ट

भेंडवडेतील तरुणाचा सांगलीत निर्घ्रुण खून; कारण अस्पष्टसांगली : खरा पंचनामा

डोक्यात दगड घालून तीस वर्षीय युवकाचा निघृण खून करण्यात आला.  शहरातील मंगळवार बाजार परिसरात सोमवारी रात्री उशीरा ही घटना घडली. कोल्हापुर जिल्ह्यातील तरुणाच्या खुनामुळे खळबळ उडाली आहे. संजयनगर पोलीस अधिक तपास करत आहेत. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

मयुरेश यशवंत चव्हाण (वय, 30 रा. भेंडवडे. ता. हातकणंगले. जि. कोल्हापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. मयूर चव्हाण सांगलीतील एका हॉस्पिटलमध्ये केअर टेकरचे काम करत होता. काल रात्री हॉस्पिटलच्या कामावरून तो आठ वाजण्याच्या सुमारास बाहेर पडला अशी माहिती त्याच्या सहकाऱ्याने दिली. त्यानंतर आज सकाळी मयूर याच्या खुनाचा प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

संशयिताना पकडण्यासाठी विविध ठिकाणी पथके तैनात करण्यात आली आहेत. घटनास्थळी उप पोलीस अधीक्षक प्रणिल गिल्डा, एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे यांनी भेट देऊन पाहणी केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.