कॅबिनेट बैठकीला फडणवीसांची दांडी, अजितदादांचं काय?
मुंबई : खरा पंचनामा
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले. एनडीएने 400 पारचा नारा दिला होता. प्रत्यक्षात 300 पार जातानाही घाम फुटला आहे. एनडीएला 292 मतं मिळाली. त्यातली 240 मतं ही भाजपची आहे. महाराष्ट्रात तर भाजपला मोठा सेटबॅक बसला आहे.
मुंबईसह काही जे भाजपचे गड म्हणून ओळखले जाणारे मतदारसंघ किंवा दिग्गज नेते मोठ्या मताधिक्याने पराभूत झालेत. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रात पुन्हा भूकंप होण्याचे संकेत असताना एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक सुरू आहे. सह्याद्री अतिथीगृहात कॅबिनेट मीटिंग सुरू आहे. दुपारी 4 वाजता राज्य मंत्रिमंडळ बैठक आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र गैरहजर राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. गिरिश महाजन यासह भाजपचे, शिवसेनेचे प्रमुख मंत्री, सहभागी होणार आहे.
पक्ष नेतृत्वासोबत चर्चा केल्यानंतरच, फडणवीस सरकारमध्ये होणार पुन्हा कार्यक्षम होणार आहे. तर, अजित पवार बैठकीत सहभागी होणार का ? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. राज्यातील धरणात असलेली पाणीसाठा परिस्थिती, पाऊस परिस्थितीनुसार पाणीपुरवठा, पाण्याचं शेतीसाठी नियोजन, पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणीपुरवठा याचा प्राप्त अहवालावर निर्णय घेतला जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या राजीनामा वक्तव्या नंतर नागपूर मध्ये भाजप कार्यकर्ते करणार फडणवीस यांच्या मनधरणीचा प्रयत्न सुरू आहेत.
कालच्या वक्तव्यानंतर आज पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस नागपूरला येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी विमानताळवर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. फडणवीस कार्यकर्त्याच्या सोबत चर्चा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.