कुरुंदवाड येथील नवविवाहितेचा पुण्यात खून
पतीने गळा आवळला; विट्यातील पतीला अटक
पुणे : खरा पंचनामा
कोल्हापुर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथील नवविवाहितेचा पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवाड येथील देहगाव येथे पतीने ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील विटा येथील पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
प्रतीक्षा जयदीप यादव (वय.21, रा. ओमसाई सोसायटी, देहू-आळंदी रोड, देहूगाव) असे त्या मृत विवाहितेचे नाव आहे. जयदीप अर्जुन यादव (वय 30, मूल रा. विटा) असे संशयित पतीचे नाव आहे. त्याला देहूरोड पोलिसांनी न्यायालयात उभे केले असता 27 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
कुरूंदवाड येथील भीमराव कोरे यांची प्रतीक्षा मुलगी होती. प्रतीक्षाचे एम.एस.सी.पर्यंत शिक्षण झाले होते. दोन महिन्यापूर्वी सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यातील चिखलगोळ येथील डिप्लोमा इंजिनियर असलेल्या जयदीप यादवशी तिचे लग्न झाले होते.
जयदिप हा पुणे येथे नोकरीला होता.8 दिवसापूर्वी पत्नी प्रतीक्षाला पुण्यात घेऊन गेला होता. गुरुवारी रात्री जयदीप हा प्रतीक्षाला ते राहत असलेल्या देहगाव येथील गाथा मंदिरामागील इंद्रायणी नदीच्या घाटावर फिरायला घेवून गेला. तेथे ओढणीने प्रतिक्षाचा गळा आवळून त्याने खून केला. संशयित पती जयदीप यादव याला पोलिसांनी अटक केली आहे.
प्रतिक्षा यादवचा खून झाल्याची माहिती कुरुंदवाड येथील माहेरच्या नातेवाईकांना पोलिसांनी दिली. नातेवाईकांनी पुण्यात जाऊन जयदीप यादवच्या विरोधात देहूरोड पोलिसात गुन्हा दाखल केला. शुक्रवारी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह आई-वडिलांच्या ताब्यात दिला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.