शपथविधीचे राज ठाकरेंना निमंत्रण नाही
खरोखरच इतकी घाईगडबड होती?
मुंबई : खरा पंचनामा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना निमंत्रण नव्हतं, त्याची चर्चा महाराष्ट्रात चांगलीच रंगली आहे.
कारण, राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्याबाबत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी 'घाईगडबडीत राहिलं असेल. मात्र याची नोंद केंद्रीय नेतृत्वाने घेतली पाहिजे,' असं स्पष्टीकरण दिले आहे.
नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. ९ जून) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्या शपथविधीला देशभरातील प्रमुख आणि मान्यवरांना निमंत्रण होते. मात्र, महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना निमंत्रण नव्हतं. असं या पक्षाचे प्रमुख नेते तथा राज ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय बाळा नांदगावकर यांनी सांगितलं होतं.
मुनगंटीवार म्हणाले, राज ठाकरे यांना मोदींच्या शपथविधी कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हतं. आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्यावर कानावर हे घातलं जाईल. घाईगडबडीत निमंत्रण द्यायचं राहिलं असेल. काहींना निमंत्रण जात नाहीत. मात्र, राज ठाकरे यांना निमंत्रण नसेल तर त्याची नोंद केंद्रीय नेतृत्वाने घेतली पाहिजे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.