Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विधानपरिषद निवडणुकीविरोधात ठाकरे गट न्यायालयात जाणार?

विधानपरिषद निवडणुकीविरोधात ठाकरे गट न्यायालयात जाणार?



मुंबई : खरा पंचनामा

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. विधानसभा सदस्यांमधून होणाऱ्या या निवडणुकीविरोधात शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

आमदार अपत्रात संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे विधानपरिषद निवडणूक घेणं हे घटनाबाह्य असल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे.

त्याच पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या 12 जुलै रोजी होणाऱ्या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्याला स्थगिती देण्यासाठी ठाकरे गट लवकरच सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहे.

सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रेबाबत खटला सुरू आहे. आमदारांवर अपात्रेची टांगती तलवार आहे. त्यामुळे या आमदारांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान करणं आणि आमदार निवडून आणणे हे घटनाबाह्य असल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे.

त्याशिवाय पक्ष फुटीनंतर काही आमदारांचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात आहेत. त्यात पक्ष सोडणार नाही, याची ग्वाही दिल्यानंतरही ते शिंदे गटात गेले. त्यामुळे आमदारांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार कसा देणार? असा सवाल ठाकरे गटाकडून उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात ठाकरे गट कायदेतज्ज्ञांची आज बैठक घेणार आहे. त्यानंतर ठाकरे गट न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.