Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'पुण्याची ओळख आता ड्रग्ज व पब्जचे माहेरघर'

'पुण्याची ओळख आता ड्रग्ज व पब्जचे माहेरघर'पुणे : खरा पंचनामा

विद्येचं माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्यात ड्रग्ज विक्रेत्यांचा सुळसुळाट दिसतोय. एका नामांकीत हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलं ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ समोर आल्याने मोठी खळबळ माजली आहे.

याप्रकरणामुळे आता सत्ताधारी चांगलेच अडचणीत सापडले असून विरोधकांनी त्यांना कोंडीत पकडले आहे. पुण्यातील एका हॉटेल मधे तरुण ड्रग्जचे सेवन करत होते त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हॉटेल मालकाला आणि पार्टी करणाऱ्या तरुणाना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आह. या प्रकरणी आता काष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक ट्वीट करत सरकारवर कडाडून टीका केली आहे.

पाटील त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात की, गेली काही वर्षे पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठला असून देशभर गाजलेल्या ललित पाटील प्रकरणानंतर काल पुण्यात काही अल्पवयीन मुलांचे हॉटेल मध्ये ड्रग्ज सेवन करतानाचे व्हिडियो व्हायरल झाल्यावर पुणे पोलिसांना जाग येऊन पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला. थोडक्यात काय तर पोलिसांना गुन्ह्यांची माहिती आता त्यांच्या खबऱ्यांकडून मिळत नसून ती सोशल मीडियावर मिळत आहे.

अगरवाल पॉर्शे कार अपघात प्रकरणात तर थेट मुलाच्या रक्ताच्या जागी मुलाच्या आईचे रक्त बदलून ठेवण्यात आले. पैशांच्या जोरावर व्यवस्थेला कशाप्रकारे वाकवले जाते, याचे समोर आलेले हे एकमेव उदाहरण आहे. लोकांच्या नजरेसमोर कधीही आले नाहीत, असे हजारो प्रकार असावेत.

'विद्येचे माहेरघर' अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख 'ड्रग्ज व पब्जचे माहेरघर' अशी होत असून यामागे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा जबाबदार आहे. पुणे शहर हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे शहर आहे.

मूळ पुण्याची जगभर असलेली ओळख पुसून जाऊन हे शहर आज सत्ताधारी भाजपा शिंदे गटाच्या सरकारमुळे बदनाम होत आहे, असेही पाटील यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.