Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आता थेट गावातून पंढरपुरापर्यंत 'एसटी' यंदाच्या आषाढी यात्रेसाठी महामंडळाची मोठी घोषणा

आता थेट गावातून पंढरपुरापर्यंत 'एसटी' 
यंदाच्या आषाढी यात्रेसाठी महामंडळाची मोठी घोषणासंभाजी पुरीगोसावी 
सातारा : खरा पंचनामा

यंदाच्या आषाढी वारी निमिंत्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी भाविक व पर्यटकांसाठी एसटी महामंडळाने चांगलीच खुशखबर दिली असून यंदा पंढरपूरला 5000 जादा बस फेऱ्या सोडण्याची मोठी घोषणा एसटी महामंडळाने केली आहे. त्याचबरोबर यंदा आपल्या गावातून थेट पंढरपूरला बस सेवा उपलब्ध केली जाणार आहे. आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला जाण्यासाठी भाविकांसाठी एसटी महामंडळाने आनंदाची बातमी दिली आहे. 

यामध्ये  विविध आगारांतून पंढरपूरला यात्रा काळात 5000 हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे. विशेष म्हणजे राज्यांतील कोणत्याही गावातून 40 अथवा त्यापेक्षा अधिक भाविक ग्रुप बुकिंग केल्यास त्यांना थेट गावातून पंढरपूरला बस सेवा पुरवण्यात येणार आहे. स्पेशल एसटी बुकिंग करण्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारांत संपर्क साधण्याचे आवाहन देखील एसटी महामंडळाकडूंन करण्यात आले आहे. 

राज्यभरांतून लाखो वारकरी विठ्ठ नामाचा जागर करीत, पंढरपूरला विठुरायांच्या दर्शनाला येतात अनेक प्रवासी स्वतःच्या खाजगी वाहनाने रेल्वेने, एसटी ने अथवा विविध पालखी सोहळ्याबरोबर पाळी चालत दिंडीने पंढरपुरात दाखल होत असतात, एसटी महामंडळाकडूंन ही दरवर्षीच अतिरिक्त बस फेऱ्या सोडल्या जातात यंदा मात्र थेट गावांतून पंढरपूरला जाता यावे यासाठी एसटी महामंडळाने मोठी घोषणा केली आहे. तसेच ज्यादा बस फेऱ्यामध्ये देखील 75 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास देणारी अमृत जेष्ठ नागरिक योजना महिलांसाठी 50% तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना, राज्य सरकारच्या सवलत योजना लागू राहतील असेही महामंडळाने स्पष्ट केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.