दाखल्यासाठी अतिरिक्त फी मागून विद्यार्थ्यांची अडवणूक करणाऱ्या श्रद्धा अकॅडमीवर युवासेनेची धडक
इचलकरंजी : खरा पंचनामा
इचलकरंजी शहरात प्रसिद्ध असणाऱ्या श्रद्धा अकॅडमीच्या चालकाकडून विद्यार्थ्यांच्या दाखल्यासाठी अतिरिक्त फी मागून विद्यार्थ्यांची अडवनुक होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेला समजले असता त्यांनी आज अकॅडमीवर धडक दिली.
तक्रारीबाबत अकॅडमीचे श्री. तांबे यांना जाब विचारला व विद्यार्थ्यांची अडवणूक दाखल्यासाठी का करता असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावेळी त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. यावेळी बोलताना युवासेना जिल्हा अधिकारी शिवाजी पाटील व शहर अधिकारी सागर जाधव यांनी जर आपण विद्यार्थ्यांची अशा पद्धतीने अडवनुक करत असाल तर युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा यावेळी दिला. तसेच भविष्यात इचलकरंजी शहरातील विद्यार्थ्यांना अडचणी येत असेल तर त्यांनी युवासेनेशी संपर्क साधावा असे आवाहन शिवाजी पाटील व सागर जाधव यांनी केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी काशिनाथ बावडेकर, तालुका अधिकारी अभिजीत लोले, विधानसभा सचिव पवन मेटे, युवा सेना समन्वयक शाहरुख मुजावर युवा सेना उपशहर अधिकारी विकास जाधव, मोहसीन नाईकवाडी, संतोष लवटे, विश्वनाथ जाधव, सागर पाटील, चेतन आगलावे, दीपक माने आदि उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.