Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शिवसेना, राष्ट्रवादी कुणाची?; सर्वोच्च न्यायालयात 'या' दिवशी होणार सुनावणी

शिवसेना, राष्ट्रवादी कुणाची?; सर्वोच्च न्यायालयात 'या' दिवशी होणार सुनावणीमुंबई : खरा पंचनामा

शिवसेना फुटल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी गेल्या काही महिन्यांपासून लांबली होती. पण आता मात्र या याचिकेवरील सुनावणीची तारीख ठरली आहे. येत्या १५ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. तसेच, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या निर्णयाविरोधातही ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवरील सुनावणी येत्या १९ जुलैला होऊ शकते.

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हांबाबत निवडणूक आयोगाने एकतर्फी निकाल दिल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. तसेच, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या ३९ आमदारांना अपात्र केले नाही, असा आरोपही ठाकरे गटाने केला आहे. तर शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर येत्या १९ जुलैला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भातही सर्वोच्च न्यायालयात १६ जुलैला सुनावणी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरही निवडणूक आयोगाने अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह दिले.

त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. तर, मागच्या सुनावणीवेळी शरद पवार यांनी अजित पवार हे प्रचारात आपल्या परवानगीविरोधात आपला फोटो वापरत असल्याचा दावा केला होता.

त्यावर न्यायालयाने अजित पवार यांच्यावर ताशेरे ओढत हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, अशी जाहिरात वृत्तपत्रात देण्याचे आदेश दिले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीआधी या दोन्ही पक्षांबाबत महत्वाच्या सुनावण्या होणार असल्याने संपूर्ण राज्यासह देशाचेही लक्ष लागले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.