विधानपरिषदेच्या निवडणुकीत अजित पवार-जयंत पाटील यांचे गुप्तगू. संजय राऊत यांचे हस्तांदोलन
मुंबई : खरा पंचनामा
अंत्यत चुरशीच्या अशा विधानपरिषद निवडणुकीत आज सत्ताधारी व विरोधी पक्षांचे एकमेकांना भेटून हस्तांदोलन करण्याचे चित्र आज दिसत होते. या भेटीत हसत खेळत गप्पाही या नेत्यांनी मारल्या. पण, या भेटीची राजकीय चर्चा मात्र चांगलीच रंगली.
विधानभवनात मतदानाच्या वेळी पहिली भेट उपमुख्यमंत्री अजित पवार व जयंत पाटील यांची झाली. राष्ट्रवादी फुटीनंतर ही भेट सर्वांच्या भुवया उंचवणारी ठरली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी सर्वांसमोरच गप्पा मारल्या. त्यानंतर हे दोन्ही पुढे निघून गेले.
तर दुसरीकडे भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील व ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट झाली. ती सुध्दा चर्चेची ठरली. त्यानंतर संजय राऊत यांची अजित पवार यांची भेट झाली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.