पुजा खेडकरने जिल्हाधिकारी सुहास दिवसेंबाबत केलेले तक्रार प्रकरण पुणे पोलीसांकडे वर्ग
तपासानंतर पुढचा निर्णय घेतला जाणार
पुणे : खरा पंचनामा
वादग्रस्त पूजा खेडकर प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. त्याचबरोबर आता या प्रकरणामध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे याचं देखील नावं घेण्यात आलेलं होतं.
सुहास दिवसे यांनी आपला मानसिक छळ केल्याची तक्रार पूजा खेडकरने केली आहे. पुण्यामध्ये प्रशिक्षणार्थी असताना हा छळ झाल्याची तक्रार पूजा खेडकरने केली. पुजा खेडकरने पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात छळवणुकीची तक्रार वाशीम पोलिसांकडे दाखल केली. त्यानंतर आता ही तक्रार पुणे पोलीसांकडे वर्ग करण्यात आली आहे. पुणे पोलिस याच्या कायदेशीर बाबी तपासताय असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलिस सर्व गोष्टी तपासून पुढचा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सुहास दिवसे यांनी पूजा खेडकरच्या विरोधात राज्य सरकारला अहवाल दिल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली होती. त्यानंतर आता पूजा खेडकरची कार्मिक मंत्रालयाच्या समितीकडून चौकशी केली जात आहे. पूजा खेडकरांचा प्रशिक्षणाचा कालावधी संपवण्यात आला असून तिला मसुरीतील प्रशिक्षण संस्थेत परत बोलवण्यात आलं आहे. पुजा खेडकरने काल (मंगळवारी) पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात छळवणुकीची तक्रार वाशीम पोलिसांकडे दाखलकेली. त्यानंतर खळबळ उडाली. वाशीम पोलिसांकडे दाखल केलेली ही तक्रार पुणे पोलीसांकडे वर्ग करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.