घरफोड्या करणाऱ्या साताऱ्यातील बंटी-बबलीला अटक
सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त, विटा पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
विटा शहरासह परिसरात घरफोड्या करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील बंटी-बबली बनून फिरणाऱ्या दाम्पत्याला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दीड लाखांची रोकड, मारूती कार, एक मोपेड असा सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विटा पोलिसांनी ही कारवाई केली.
विश्वास हणमंत गुजर (वय ३३), पूजा विश्वास गुजर (वय २६, दोघेही रा. जकातवाडी, सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विटा येथील बाळासो रावताळे यांनी तक्रार दिली आहे. दि. ५ जानेवारी रोजी रात्री रावताळे यांच्या विट्यातील आरती ज्वेलर्स या दुकानातील तीन लाखांची रोकड अज्ञातांनी लंपास केली होती. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेला ही चोरी गुजर दाम्पत्याने केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली.
पथकाने सातारा येथे जाऊन सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना अटक करून त्यांच्याकडून दीड लाखांची रोकड, एक मारूती कार, एक मोपेड असा सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विट्याचे पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाने उत्तम माळी, दिग्विजय कराळे, हेमंत तांबेवाघ, प्रमोद साखरपे, महेश देशमुख, महेश संकपाळ, अक्षय जगदाळे, करण परदेशी, विवेक साळुखे, अजय पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.