Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दोन वर्षांच्या चिमुकलीसह आईने घेतली कृष्णा नदीत उडी

दोन वर्षांच्या चिमुकलीसह आईने घेतली कृष्णा नदीत उडी



सातारा : खरा पंचनामा

सातारा जिल्ह्यात माहेरी आलेल्या एका महिलेने आपल्या दोन वर्षांच्या चिमुरडीसह कृष्णा नदीत उडी घेतल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संचिता साळुंखे (वय-22) असं कृष्णेच्या पात्रात उडी घेतलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना 27 जुलै रोजी वडूथ येथे घडली आहे. मुलीचा मृतदेह सापडला असून महिला मात्र अद्याप बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संचिता साळुंखे ही महिला काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील वडूथ येथे आपल्या माहेरी आली होती. माहेरी येताना या महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलीला देखील सोबत आणले होते. दरम्यान, महिलने 27 जुलै रोजी आपल्या दोन वर्षांच्या मुलीसह कृष्णा नदीत उडी मारली आहे.

या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कृष्णेच्या पात्रात सध्या शोधमोहीम सुरु असून 2 वर्षीय मुलीचा मृतदेह शोधण्यात पथकाला यश आलं आहे. मात्र महिला अद्याप बेपत्ता असल्याची माहिती मिळतेय. महिलेने नदीत उडी का घेतली? या घटनेचे नेमके कारण काय? हे अद्याप समजू शकलेले नसून सध्या या महिलेचा शोध घेतला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे कृष्णेच्या पात्रात झपाट्याने वाढ होत आहे. असं असताना पाण्याच्या प्रवाहात महिलेचा शोध घेताना अनेक अडचणी येत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.