Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील सात वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील सात वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या



मुंबई : खरा पंचनामा

राज्यातील सात वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीने मंगळवारी हे आदेश काढण्यात आले आहेत.  
 
बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे नाव कंसात कोठून कोठे बदली : शशिकांत महावरकर (विशेष पोलिस महानिरीक्षक नांदेड ते विशेष महानिरीक्षक सीआयडी पुणे), डी. टी. शिंदे (अपर पोलिस आयुक्त ठाणे शहर पूर्व ते अपर पोलिस आयुक्त मिरा-भाईंदर-वसई-विरार), संजय जाधव (अपर पोलिस आयुक्त प्रशासन ठाणे शहर ते अपर पोलिस आयुक्त ठाणे शहर पूर्व), श्रीकांत पाठक (अपर पोलिस आयुक्त मिरा-भाईंदर-वसई-विरार ते अपर पोलिस आयुक्त प्रशासन ठाणे शहर), अभिषेक त्रिमुखे (पोलिस उपमहानिरीक्षक राखीव बल मुंबई शहर ते अपर पोलिस आयुक्त मुंबई), शहाजी उमाप (अपर पोलिस आयुक्त विशेष शाखा मुंबई ते उपमहानिरीक्षक नांदेड), शिवाजी राठोड (अपर पोलिस आयुक्त नागपूर दक्षिण ते अपर पोलिस आयुक्त विशेष शाखा मुंबई). 

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.