रात्री गस्तीवरील दोन पोलिसांना भरधाव कारने उडवले, एकाचा मृत्यू
पुणे : खरा पंचनामा
महाराष्ट्रात हिट अँड रनच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पुण्यातून ताजे प्रकरण समोर आले आहे. मध्यरात्री झालेल्या हिट अँड रन प्रकरणात पुणे पोलिस दलातील एका हवालदाराचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. जुना पुणे-मुंबई महामार्गावरील हॅरिस पुलाखाली पहाटे 2 वाजता हा अपघात झाला.
खडकी पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून कार्यरत असलेले दोन पोलीस हवालदार त्यांच्या दुचाकीवरून रात्रीच्या गस्तीसाठी जात असताना त्यांना भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने धडक दिली. यादरम्यान कॉन्स्टेबल समाधान कोळी यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक वाहनासह पळून गेला.
बातमीनुसार, बीट मार्शल रात्री गस्तीवर होते. दरम्यान एका चारचाकी वाहनाने दोघांना मागून धडक दिली. यामध्ये पोलीस कर्मचारी समाधान कोळी यांचा मृत्यू झाला. पोलीस हवालदार शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर आरोपी चालक फरार झाला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे कारचा शोध सुरू केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.