कोल्हापूरात प्रपोज, पुण्यात फिरायला आणून लैंगिक अत्याचार
सांगलीतील तरुणावर गुन्हा
पुणे : खरा पंचनामा
कॉलेजमध्ये शिकत असताना तरुणीसोबत मैत्री करुन तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर कोल्हापूर येथे मुलीला प्रपोज करुन तिला फिरण्याच्या बहण्याने पुण्यात आणून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
त्यानंतर लग्न करण्यास नकार देऊन फसवणूक केली. याप्रकरणी पिडित तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत आटपाडी तालुक्यातील 23 वर्षीय तरुणीने शुक्रवारी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजय तानाजी डोंबाळे (वय 24 रा. हिवतड ता. आटपाडी, जि. सांगली) याच्यावर आयपीसी 354, 354 (ड), 376/2/एन, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 18 जून 2023 ते 18 डिसेंबर 2023 या कालावधीत पुणे, सातारा व कोल्हापूर येथे घडला आहे.
पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी आटपाडी तालुक्यातील ग्रामीण भागात राहणारे आहेत. ते एकमेकांचे मित्र असून आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेजमध्ये शिकतात. विजय डोंबाळे याने मुलीला कोल्हापूर येथे प्रपोज करुन तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला फिरण्यासाठी पुण्यात घेऊन आला. शनिवार वाड्याजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये कॉफी पित असताना त्याने मुलीसोबत अश्लील चाळे करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
त्यानंतर एका लॉजमध्ये नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. संबंध ठेवत असताना आरोपीने त्याच्या मोबाईल मध्ये फोटो काढले. फिर्यादी यांनी लग्नाबाबत विचारणा केली असता विजय याने अश्लील फोटो व्हायर करण्याची धमकी दिली. याबाबत पिडीत मुलीने सांगली येथे तक्रार केली होती. सांगली पोलिसांनी हा गुन्हा शुक्रवारी विश्रामबाग पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. आरोपीने सातारा आणि कोल्हापूर येथील लॉजमध्ये नेऊन अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पीएसआय विशाल पाटील करीत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.