लोणावळ्यात 'आयएनएस शिवाजी' येथे हवालदाराची गोळी झाडून आत्महत्या
लोणावळा : खरा पंचनामा
लोणावळा जवळ असलेल्या नौदलाच्या 'आय एन एस शिवाजी' येथे हवालदाराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.12) दुपारी घडली आहे. हरेंद्र सिंग असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस हवालदाराचे नाव असून ते डीआरडीओ येथे कार्यरत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, हरेंद्र सिंग हे डीआरडीओ येथे पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. अति सुरक्षित समजल्या जाणाऱ्या लोणावळा जवळ नौदलाचे 'आयएनएस शिवाजी' हे केंद्र आहे. या ठिकाणी जाऊन हरेंद्र यांनी पिस्तुलातून गोळी झाडून घेत आत्महत्या केली.
हरेंद्र सिंग हे 'आयएनएस शिवाजी' येथे काय करत होते. तसेच त्यांच्याकडे पिस्तुल कसे आले, याबाबत तपास सरु आहे. हरेंद्र यांनी कौटुंबिक कारणावरुन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सिंग हे पिस्तूल घेऊन कसे गेले आणि त्यांनी आत्महत्या का केली याचा तपास आता सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच पुणे ग्रामीण पोलीस यांच्याकडून सुरू झाला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.