Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विधानपरिषद निवडणुकीपूर्वी महायुती अलर्टवर; आमदारांची पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्था

विधानपरिषद निवडणुकीपूर्वी महायुती अलर्टवर; आमदारांची पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्था



मुंबई : खरा पंचनामा

येत्या १२ जुलैला विधानपरिषदेच्या 11 जागांसाठीची निवडणूक होत असून ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उभे आहेत. त्यामुळे या निवडणुका बिनविरोध होणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. पण लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यामुळे आता भाजप महायुती ताकही फुंकून पीत असल्याचे दिसत आहे. याचे कारण म्हणजे निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून महायुती आमदारांची मोठी व्यवस्था केली आहे.

मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आपल्या आमदारांची व्यवस्था केल्याची माहिती समोर आली आहे. पुढचे तीन दिवस हे आमदार याच ठिकाणी राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार उभे असल्याने निवडणुकीत मते फुटण्याची दाट शक्यता आहे. ही फाटाफूट होऊ नये यासाठी सर्व पक्ष योग्य ती खबरदारी आणि घेताना दिसत आहेत. अजित पवार यांनीही मंगळवारी एक बैठक घेत विधानपरिषदेच्या निवडणुकीत दगाफटका किंवा मंतांची फाटाफूट होऊ नये, यासाठी सुचना दिल्या. तर, भाजपनेही त्यांच्या आमदारांची पंचतारांकित हॉटेलमध्ये सोय केली आहे. तर, एकनाथ शिंदे यांनीही आमदारांना मोठ्या हॉटेलमध्ये ठेवणार असल्याची माहिती आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामुळे सध्या सर्व आमदार मुंबईत आहेत. त्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये यासठी भाजपचे सर्व आमदारांचा ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये मुक्काम असणार आहे. तसेच, विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना एअरपोर्ट जवळच्या ललित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून राष्ट्रवादीकडून खबरदारी घेतली जात आहे.

तर या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण काँग्रेसन अद्याप कोणतेही हॉटेल बुक केलेले नाही. पण सर्व आमदारांनी एकत्रित मतदान करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. काँग्रेसकडे सध्या एकूण 37 मते आहेत. त्यांचा 23 मतांचा कोटा पूर्ण झाल्यानंतरही 14 मते शिल्लक राहतात. ही मते जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांना मिळू शकतात असेही सांगितले जात आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.